सौ. अबोलीताई,
शीखाताईंच्या प्रस्तावातील लिखाणावरून (मी प्रेम केले आणि त्याच्यासोबत लग्न ही केले.) त्यांचं लग्नं झालंसं वाटतंय...

बाकी तुम्ही म्हणता ते अगदी खरं. मैत्रीण.. प्रेयसी.. बायको ह्या तीन अगदी भिन्न व्यक्तिरेखा आहेत. पण ह्या तिन्हींचा मेळ फक्त चित्रपटात जमतो म्हणजे काय? म्हणजे खऱ्या आयुष्यात मैत्रीण, प्रेयसी आणि बायको ह्या तिन्ही भिन्न असतात की काय? मैत्रीण ही प्रेयसी आणि बायको पेक्षा भिन्न असण्यास हरकत नाही. पण प्रेयसी ही बायकोपेक्षा वेगळी? अहो, केवढा गहजब माजेल ह्याचा विचार केलाय का? असो, पण हे मात्र खरं की ह्या तीन व्यक्तिरेखांची (व्यक्तींची नव्हे) तुलना करू नये.