अभिजीत,
तुमचे म्हणणे खरे आहे. असे अनुभव बऱ्याच जणांना येतात. अगदी अशा लोकांना सुद्धा की जे स्वतः इतरांना असे अनुभव देतात!

वेदश्री म्हणतात त्याप्रमाणे,
नात्यांबाबत/मैत्रीबाबत संपूर्ण अपेक्षारहित असावे खरे, पण ते सामान्यपणे शक्य होत नाही हेही तेवढेच खरे. आपण कितीही म्हटले, प्रयत्न केला तरीही काही माफक अपेक्षा प्रत्येक नात्याकडून असतातच. त्यामुळे जो त्रास अपेक्षा असल्या तर येईल, तो भोगावाच लागतो. तरीही जर आपण असे प्रयत्न करत गेलो तर या अपेक्षांचे प्रमाण नक्कीच कमी होवू शकेल अन् पर्यायाने आपल्याला होणारा त्रासही.