वेदश्रीताई,

'मै टल्ली हो गयी' सारखी गाणी सर्रास सर्व वाहिन्यांवर दाखवली जातात म्हणे. असे असताना छोट्या मुलांना बघायला कोणत्या वाहिन्या परवानगी द्यायची ते कळेनासे होते.

आजकाल छोटी मुलेच मोठ्यांनी काय बघावे हे ठरवतात असे आम्ही काही अनुभवी लोकांकडून नेहमी ऐकत असतो

शिवाय अशा गाण्यांच्या बातम्याही होतात असे ऐकले आहे.. म्हणजे तर अगदी जय जय रामकृष्णहरीच!

बातम्यांबाबत मात्र आम्हीदेखील चिंतित आहोत. कुठे त्या दूरदर्शनच्या सोज्ज्वळ बातम्या आणि कुठे ह्या वाहिन्यांच्या उठवळ बातम्या!

लेखाचा रोख कळला आणि त्याबद्दल अगदी सहमत.

आनंद झाला.

आपला,
(आनंदित) आजानुकर्ण