हिंदी भाषेतील काही शब्दांचे मराठीकरण करताना त्यातील गोडवा किंवा नेमकेपणा जातो.>>
हे खरेच आहे.
परदेसीया, मंझधार, दुनिया बसाना म्हणजे अनुक्रमे परदेशीया, भर प्रवाह आणि संसार वसवणे.
ते नेमके अर्थ प्रत्यक्षात कधीच साधत नाहीत. म्हणूनच मूळ कवितांपेक्षा पद्य अनुवाद लोकप्रिय होत नाहीत.
मी मूळ अर्थाच्या जवळपास पोहोचण्याचा कसा प्रयत्न केला आहे ते आपण पाहिलेच आहे.
तरीही, पद्य अनुवाद सगळ्यांनाच काही करावासा वाटत नाही.
ज्यांना वाटतो त्यांना एका वेगळ्याच सुसंगतीचा शोध लागलेला असतो.
तो तुम्हाला लागलेला आहे. म्हणून करत राहा. कसब साधेल.
लोकांनाही खरे तर अनुवादांची गरज असते पण ती सहजासहजी मान्य न करण्याचा कल असतो.