"संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरांत 'ह्' हा नेहमी प्रथम येतो. जसे : ब्रह्म, ब्राह्मण, चिह्न, हृस्व, जिह्वा, प्रह्लाद पण मराठीत या 'ह्' चा उच्चार प्रारंभी न करता वर्णांची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनाचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. जसे : ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, ऱ्हस्व, जिव्हा,प्रल्हाद."
-कै. मो. रा. वाळिंबे (सुगम मराठी व्याकरण-लेखन, आवृत्ती दुसरी, जून २००३, पृष्ठ १३)