सोळा आण्यांचा एक रुपया असे आणि एक आणा चार पैशांचा. म्हणजेच चौसष्ट पैशांचा एक रूपया. त्या काळी रुपया-पैशाची दशमान पद्धत अस्तित्वात नव्हती. प्रभाकरपंत चौदा रूपये एकोणतीस पैसे काढायला गेले होते.
दशमान पद्धत अस्तित्वात आली होती असे गृहीत धरले तर प्रभाकरपंत सव्वीस रुपये त्रेपन्न पैसे काढायला गेले असे म्हणता येईल.