सर्व वाचकांचे आभार.
हर्षवर्धन गोविलकर ह्यांनी विचारले आहे
समजा ही गोष्ट मला इंग्लिशमध्ये सांगायची असेल तर
तितली मख्खी आजाद छुवावे
हे शब्द तसेच ठेवावे की त्यांचे भाषांतर करावे
मला असे वाटते, कुठल्याही कथेत महोल किंवा वातावरण निर्मीतीला खूप महत्त्व असते. ह्या कथेत यासीमच्या व्यक्तीमत्वाच्या जवळ पोहोचण्यासाठी उर्दू शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केला आहे. सुदैवाने, मराठी वाचणारया खूप लोकांना हे शब्द ओळखीचे आहेत. त्याचा मला फायदा करून घेता आला.
ईंग्लीश मध्ये भाषांतर करतांना हा फायदा मिळणार नाही. पण हरकत नाही.
मात्र कृपया भाषांतर काराने जाणीवपूर्वक मूळ लेखकाचे नांव द्यावे.
चित्त ह्यांनी विचारले आहे
ह्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर आवडले असते.
ही विज्ञान कथा आहे. हे तंत्रज्ञान सध्या प्रायोगीक अवस्थेत आहे. उद्याचे कोणी संगावे? हा दुवा पहा. (दुवा मनोगत स्विकारत नाही आहे)
http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/1270306.stm