निमिषश,
चांगले निरीक्षण केलेत. अजून काही निरीक्षणे.
"स्त्रीने पूजेला बसताना उजवीकडे बसावे व  हे कायम लक्षात ठेवायचे असल्यास आपण चारचाकी वाहन चालवतो त्याच्या नेमके उलटे करा" असे एकदा पूजेला बसले असता गुरुजींनी सांगितले होते व ते कायम लक्षात राहिले. येथे स्त्रीला महत्त्व जास्त दिले आहे.
बिछान्यावर झोपतानाही हा क्रम डावा असतो तो का ते विवाहितांच्या लक्षात येईलच ! 
मात्र रस्त्यातून चालताना बऱ्याचदा पती डावीकडे असतो.
स्कूटरवर बसताना डावीकडे पाय सोडून स्त्रिया बसतात अर्थात विरुद्ध बाजूची वाहतुकी पासूनचा उपद्रव टाळण्यासाठी असेल. उजवीकडच्या खेळाडूने प्रथम खेळण्यास (सर्व्हिस)  सुरुवात करावी असा प्रघात बॅडमिंटन व टेनिस खेळांत आहे.
ह्यामागील कारणे माहीत नाही पण ही निरीक्षणे ह्या निमित्ताने समोर आली.