अजून काही लिहायचे राहिले होते.
माझ्या प्रतिसादाचा विषय मी उजवा-डावा असा लिहिला आहे पण बोलताना मात्र वाक् प्रचार आपण डावा/उजवा असा करतो.
सैनिकी कवायत - लेफ्ट राईट अशी होते......
क्रिकेट खेळातला गोलंदाज उजवा असल्यास चेंडू फेकताना त्याचा डावा पाय पुढे येतो व डावरा असल्यास उजवा पाय !
शरीराच्या विरुद्ध  (अवे) लिखाण सोपे पडते म्हणून डाव्या हाताने शरीराकडे (टोवर्डस) लिहिणारे डावरी मुले लेखनांत हळू असतात (माझ्या मुलीवरून हा अनुभव आला आहे) तर लेखनाचा वेग उजव्या हाताने लिहिणाऱ्याचा जास्त असतो.  
उजव्या माणसाची उजवी अंगे ही डाव्या अंगांपेक्षा बलवान (स्ट्राँग) असतात (तर डावऱ्यांची डावी) व त्यांची मापे वेग-वेगळी असतात. पायातल्या बुटांचेही तसेच असते. उजव्या माणसाला उजवा बूट पायात घालायला जास्त वेळ लागतो.