१. कथा म्हणाल तर, एक निश्चित आहे की अपेक्षा उंचावत नेऊन अचानक थांबली. रस्त्यात अचानक समोर एखादं वाहन आल्यानं आपल्या गाडीचा ब्रेक कचकन दाबला गेला की जसा धक्का बसतो तसा धक्का बसला कथन आटोपतं घेतल्यानं.
२. मॅडम या व्यक्तिरेखेला मात्र या एका प्रसंगासाठी 'मॅडम' या भूमिकेपुरतं पूर्णत्त्व मिळालं आहे हे निश्चित. त्यादृष्टीनं कथन पूर्ण ठरलं आहे.
२. सत्यघटना म्हटल्यावर तर पुढं काय झालं याची उत्कंठा लागून राहते. म्हणजेच कथेचा उत्तरार्ध निश्चित असावा. अगदी नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे काही झालं नसेल तरीही ते तसं का झालं नाही यातून मॅडमचं जे व्यक्तिमत्त्व पुढं येऊ शकतं त्यातून ती व्यक्तिरेखा आणखी उंचीवर गेली असतीच.
ही प्रतिक्रिया सविस्तर देण्याचं कारण म्हणजे या व्यक्तिरेखा वास्तवात कोण असाव्यात याचा अंदाज आहे. शिवाय अशा गोष्टी जवळून पाहत असल्यानं हा अपुरेपणा मला जाणवला आहे. सर्वांनाच तो जाणवेल असं नाही. माझ्या आस्वादाची ही बलस्थानं असतील; त्याचप्रमाणे मर्यादाही.