जर वर दाखविलेल्या पद्धतीचा अवलंब केला तर मराठी बरोबरच इंग्रजीचे व्याकलन ही सोपे होईल व एकांगी दृष्टिकोनही टाळला जाईल.

मराठी, इंग्रजीच काय जगातली कुठलीच भाषा तुमच्या टेकनिकच्या आवाक्यातून सुटणार नाही.

मला वाटते अस्तित्वात असलेल्या भाषेत इतके शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे बदल करण्यापेक्षा तुमच्या तीक्ष्ण आकलनशक्तीच्या आणि सुंदर कल्पनाशक्तीच्या जोरावर एखादी नवी भाषाच बनवायला घ्यावी, त्यात तुम्हाला जास्त स्वातंत्र्य मिळेल. (पाणिनीने तरी दुसरे काय केले?)

अशा लेखनाला ऑटोमॅटिक करेक्ट करणारी काही सॉफ्ट्वेअर तुम्हाला माहीत असली तर सांगा. मला बरेच लिहायचे आहे पण चुका होतात आणि त्या दुरुस्त करायाला वेळ लागतो. किंवा अशा लेखनाचा उपयोग करून कुणीतरी बनवा आणि कृपया मला सांगा.