नमस्कार,

आपला लेख वाचला. आपण शिवकालीन भाषेचे उदाहरण दिले आहे. त्याकाळातील भाषेत व आताच्या बदल झालेला आहे तो आपल्याला सहज समजून येतोच आहे. तसे पाहिले तर बारव्या/तेराव्या शतकातील मराठी (ज्ञानेश्वरकालीन) व शिवकालीन मराठी यातही बदल झाले आहेत. इतकेच काय, गेल्या शतकातील मराठी व आजची मराठी यातही अनेक बदल झाले आहेत. उदाहरणार्थ : मला पुस्तक दाखीव. -->  मला पुस्तक दाखव. आपणही मागच्या लेखात भाषेच्या प्रवाहीपणाचा उल्लेख केला आहे.
तर मला अजूनही या मराठी "नव-व्याकरण" रचनेमागील उद्देश समजून येत नाही आहे.
आपल्याला न बदलणारी भाषा तयार करण्याची इच्छा आहे का ? कारण अजून शे-दोनशे वर्षांनी जर मराठीचे अजून वेगळे रूप असू शकणार आहे, तर नवीन व्याकरण कशाला लिहायचे आहे ? कृपया पुन्हा थोडे संकल्पनेच्या मूळ उद्देशाबद्दल सांगाल काय ? किंवा सध्याच्या व्याकरणात अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला आढळल्या की ज्यामुळे नव-व्याकरणाची संकल्पना आपण मांडत आहात ?

- पराग