सतीशराव,

भ्रंश्- भ्रश् (चतुर्थगण परस्मैपद) ह्या संस्कृत धातूचा अर्थ 'गळून पडणे' असा आहे. तो भ्रश्यामि भ्रश्यावः भ्रश्यामः असा चालतो. जेव्हा त्याचे 'त-प्रत्ययान्त कर्तरि भूधावि' करतो तेव्हा 'त' च्या ऐवजी 'ट' हा प्रत्यय जोडला जातो आणि त्या 'ट' मुळे 'श' चा 'ष' होतो. जसे :- ज्याचा नाश झाला तो नष्ट होतो. अर्थात आपण जर 'श' आणि 'ष' मध्ये काहीच फरक मानत नाहीत त्यामुळे आपणांस योग्य वाटेल तोच शब्द आणि आपणांस योग्य वाटेल तेच अक्षर आपण वापराल यात तिळमात्र शंका नाही. आम्ही काही सांगून तुम्ही ऐकणार होय!

अवांतर: एखादा शब्द हा दुसऱ्या एखाद्या शब्दासारखा वाटतो म्हणून वापरणे योग्य नाही असे जर ठरवले तर अनेक शब्द मोडीत काढावे लागतील. ह्यावरूनच आठवलं, माझ्या एका मैत्रिणीला मी म्हटलं की ती खूप लाघवी आहे तेव्हा तिने ह्या विशेषणाची दुसऱ्या एका शब्दाशी तुलना केली होती. पण लाघवी ह्या शब्दाला काहीही पर्याय नाही असे सांगून मी तोच शब्द वापरला. (संस्कृतमध्ये 'लहान करून'ला लघ्वीकृत्वा असे म्हणतात. आता ह्यावर काय बोलता?)

ही लिपी नव्हे हो. नाहीतरी आपण लिपीबदलाचे खंदे पुरस्कर्ते आहात. देवनागरी सोडून मोडी वापरायला लागायचात!