ब्राह्मण/ब्राम्हण ह्या शब्दाचा अर्थ अशा वेगळ्या तऱ्हेने विशद केल्याबद्दल धन्यवाद!

आता, तुम्ही उच्चाराबद्दल जे विचारत आहात त्याबद्दल. पुढील वाक्य वाचून त्याचा अर्थ सांगा. 'दिव्याने कागद जाळले.' ह्यातील 'दिव्याने'चा उच्चार जसा कराल तसा ह्या वाक्याचा अर्थ होईल. ती दिव्या नावाची एखादी मुलगी असेल जिने कागद जाळले किंवा एखाद्या/दीने दिवा पेटवून त्या दिव्याने कागद जाळले. उच्चार करताना तुम्ही जोर कुठल्या शब्दावर देता त्यावर अर्थ अवलंबून असेल. आणि अर्थ नक्की काय होईल तो संदर्भावरदेखील अवलंबून आहे. असो...