अहो, तुम्ही माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा. मैत्रीण.. प्रेयसी.. बायको ह्या तीन अगदी भिन्न व्यक्तिरेखा आहेत. व्यक्ती नाही म्हणते मी. साधारणतः पहिल्यांदा मैत्री होते, मग प्रेम आणि मग लग्न.. म्हणजेच हे टप्पे, आधी मैत्रीण मग प्रेयसी आणि मग बायको असे असतात. तसंच, मित्र.. प्रियकर..नवरा.. ह्या तिन्ही व्यक्ती एकच आहेत पण पैलू निरनिराळे आणि अपेक्षाही निरनिराळ्या.. आता प्रेयसीच्या अपेक्षा नवऱ्याकडून पूर्ण होतीलच असं नाही. पण तीच  जेव्हा बायको असते, तेव्हा अपेक्षा कमी होतात. त्या अर्थाने मी शीखाताईंना सल्ला दिला की, इतके दिवस तुम्ही लग्नानंतरही प्रेयसीसारख्या अपेक्षा करत असाल तर आता बायको बनून बघा. अपेक्षा कमी होतील आणि भांडणेही.. :)