>हे फारच आदर्शवादी उत्तर झालं.

आदर्शवादी पण अत्यंत व्यावहारीक उत्तर.

>निरपेक्ष मैत्री करावी, हे मलाही कळतं, पण सहजासहजी वळत नाही ना!

हळूहळू जमेल/जमवावे लागेल वळवायला.

जे काही सच्चं असतं त्याचीच सत्त्वपरीक्षा पाहिली जाते असे म्हणतात मग तेच आपल्या कोणाशी असलेल्या दोस्तीलाही लागू होतेच की ! दोस्तीची परीक्षा बघितली जाते ज्यातून तावूनसुलाखून बाहेर पडते तीच खरी दोस्ती. आज सच्चा भासत असलेला दोस्त उद्या पलटून विचारेनासा झाला म्हणजे लगेच त्याच्या दोस्तीवर प्रश्नचिन्हं उभे करायचे म्हटल्यास तुमचाच तुमच्या दोस्तीवर विश्वास नाही असे होईल.. दोस्त बनवायला निवड करताना जे काही निकष आपण लावले होते ते बरोबर आहेत याची जर आपल्याला पुरेपूर कल्पना असेल तर त्यावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात काही हशील नाही. दोस्त आज विचारत नाही म्हणजे कधीच विचारणार नाही असे नाही.. आणि समजा जर मरायच्या घटकेलाही विचारले नाही तर आपली दोस्ती एकतर्फी होती असे समजावे आणि त्या एकतर्फीपणातही जे काही सौख्य असेल ते मिळाले हेच आपले भाग्य असे समजावे. हे खूप तटकतोड वाटेल पण आजवरच्या अनुभवातून जे शिकलेय त्याचे सार लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय इतकेच.

>समजा, मला वाटलं, तुमच्याशी मैत्री करावी. पण तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाहीत, तर काय करायचं?
किमान माझ्याबद्दल तरी असे होणार नाही. जेव्हा कधी वाटेल तेव्हा दोस्तीचा व्यनी लिहा, मी प्रतिसाद देईनच जो काय द्यायचा तो. :)