तुम्ही लिहिलेल्या सत्यघटनेवरून आणखी एक सत्यघटना आठवली. ती अशी.

आमच्या ओळखीचे एकजण - त्यांचा मुलगा १२ वी ला (शास्त्र विभाग) ९५% गुण मिळवून पास झाला.

त्याला मेडिकलला ऍडमिशन घ्यायची होती, पण अडीच लाख डोनेशन मागितल्यामुळे तो ती घेऊ शकत नव्हता.

घरची परस्थिती फारशी चांगली नाही, कोणाकडून रक्कम कर्जाऊ घेतली तर ती परत फेडायची कशी? हा त्याच्या वडिलांपुढे यक्ष प्रश्न. आणि पुन्हा इतर खर्च आहेतच. मुलाच्या भविष्याची चिंता भेडसावत होती. बी.एस‌‌‌.सी. ला ऍडमिशन घ्यायचे ठरले, अशातच एकजण चेष्टेत म्हणाला, "२५००० रुपये भरा आणि जात बदलून घ्या".

मुलाच्या वडिलांनी विचार केला आणि खरोखरच जात बदलून घेतली.

जात बदलल्यामुळे ऍडमिशन मेडिकलला मिळाली. २५०००० ऐवेजी २५००० काम झाले.

मी खरंतर प्रतिसाद म्हणून ही सत्यघटना लिहिली. त्यामुळे तिची रचना फारशी चांगली नाही, तसेच शुद्धलेखनात काही चुका असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमस्व.