दयारामला अभिमान शिपाई राहण्याचा नाही. त्याची शैक्षणिक पात्रता ध्यानात घेता त्याला इतर काही होणे शक्यही नव्हते. त्याला शिपाई ठेवण्यात इतर कुणी धन्यता मानण्याचा प्रश्नच नाही.
जी. ए. म्हणायचे की लेखक एवढे श्रम करून लिहीत असतो, वाचकाने किमान ते लिखाण काळजीपूर्वक वाचण्याचे कष्ट घ्यावेत. आवडले नाही तर स्पष्टपणे तसे लिहावे. झेब्रा आवडत नसेल तर त्याला झेब्रा म्हणून हाकलून द्या. हा असला कसला पट्यापट्याचा उंट असे म्हणू नका!