देवदत्त, आपण महाभारत पूर्ण बघायला हवे होते.
आणि सुरुवातीलाच द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग का दाखवला याबाबत मी ही थोडा संभ्रमीत होतो. पण नंतर त्या मागचा उद्देश लक्षात आला. ते एका स्त्रीने (एकता कपूर) दिग्दर्शीत केले असल्याने तीला त्यातून हे सांगायचे होते की वस्त्रहरणाचा हा प्रसंग पूर्ण महाभारताला कलाटणी देणारा होता आणि त्यात द्रौपदी शाप देते की, सगळ्या कुणाचा नाश होईल वगैरे. म्हणजे थोडक्यात स्त्री ला यात महत्त्व दिले आहे. आणि श्रीकृष्णाचे चक्र द्रौपदीला साडी पुरवते असे दाखवले आहे. तेथून नंतर लगेच, युद्ध होवून गेलेले असते असे दाखवले असून व्यास त्या युद्धामुळे व्यथीत होतात, तेव्हा ब्रम्हदेव त्यांना सांगतात की, गणपतीच्या मदतीने पुढील पिढ्यांसाठी तू महाभारत लिही....
प्रेझेंटेशन चांगले होते. आम्हीही सुरुवातीला चॅनेल बदलवण्याचा विचार करत होतो, पण सिरियल संपेपर्यंत वाट पाहिली.