मला तर टि. व्हि. ह्या प्रकाराचे व त्यातल्यात्यात त्यावरील मालिकांबद्दल घृणाच निर्माण झाली आहे.
सकाळी ११.३० ते दु. ५ व सायंकाळी ६. ३० ते रात्री १० ह्या वेळेत घराबाहेर आपण जास्त सुखी असे वाटायला लागते.  (नशीब ते डबड मधल्या काळात बंद असते ते ! )  
झी मराठी / ई मराठी ह्या वाहिन्या बंद केल्यास त्यांच्या मालकांसाठी आजन्म मी त्यांच्या घरातली धुणं भांडी चकटफू करायला तयार आहे इतपत आता वेळ आली आहे.
डोळ्यांची पापणीही न हलवता ह्या मालिका बघणाऱ्या मंडळींना मनोरुग्ण म्हणावे की काय असेही वाटते.