मैत्रीबद्दल आपल्या काही अपेक्षा असतात, त्या दरवेळी पूर्ण होऊ शकत नाहीत, हे नक्की.
जीवनाबद्दलच्या अपेक्षांबद्दलही तेच.
मैत्री करावीशी वाटते, पण प्रतिसाद न मिळाल्याने होऊ शकत नाही, हे कबूल. पण काही वेळा चांगले मित्रही काही विशेष कारण नसताना दुरावतात..... कारण शोधायला गेलं, तर सापडत नाही.... मैत्री संपली नाहीये, हे सांगतात, पण ती टिकवण्यासाठी प्रयत्न/इच्छाही दाखवत नाहीत. असं अनेकदा होतं, नाही का?
जास्त त्रास होतो, अशा वेळी.
असो.
बराच मोठा विषय आहे. शेवटी प्रत्येक जण आपल्या अनुभवांवर, संस्कारांवर, पार्श्वभूमीवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोव्रुत्तीवर आधारित निर्णय घेत असतो.