ग्रामु,
>"आदर्शवादी पण अत्यंत व्यावहारीक उत्तर. " ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस प्रत्यक्षात येतील का?
मीतरी माझ्यापुरत्या आणल्यात बा. आणाव्याच लागल्या कारण मला माझ्या जगण्यामागचे उद्धीष्ट पूर्ण करायला जगायचंय ज्यासाठी माझे जितके आहे तितके डोके आणि मन ठिकाणावर ठेवणे प्राप्त आहे !
>अभिजित व वेदश्री यांच्या विचारांतील फरक; स्त्री व पुरूषांच्या विचारधारेतील मुलभूत फरकाचे outcome आहे का?
हे म्हणजे भूतावरून नरक गाठल्यासारखेच. एका विशिष्ट व्यक्तीच्या विचारांचे असे सामान्यीकरण करू नये असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी जर अभिजितने हा लेख लिहिला असता तर मीही कदाचित त्यावेळी 'माझ्या मनीची व्यथा आपण अगदी योग्य शब्दात मांडलीत...' असा प्रतिसाद लिहून गेले असते. स्त्री आणि पुरूष असा फरक असण्यापेक्षा मला वाटते की आलेल्या अनुभवातून नक्की काय आणि कसे शिकायचे या मुद्द्यावर सगळे आधारीत असावे.