स्वप्नविरहाचा हा खेळ चालू आहे असे मला वाटते.
पाहा ना, हल्ली वयाच्या ३ ऱ्या वर्षापासून मुलांना दावणीला बांधले जाते - म्हणजे 'समाजाच्या कालचक्रात'!
ज्युनियर मग सीनियर के. जी. ; बिगरी ते मॅट्रिक. पुढे पदवी, उच्च शिक्षण. त्यापुढील पायरी - नोकरी, लग्न, संसार... गाडी थांबतच नाही!!!
या प्रत्येक वेळी 'स्वप्नविरहाचा' खेळ चालू असतो.
त्याचे स्वरुप, तीव्रता, व्याप्ती, परिणाम; वगैरे बाबी बदलतात.
आयुष्यात तेवढाच आणखी एक विरंगुळा.