"आंधाराहून कृष्ण छाया, स्वतःचीच पाहतो
नीरव अश्रू विना हुंदके, अंतरीच दाबतो

क्षीण कवडसा कधी उतरतो, नलीकेतून खाली
मित्रची जणू येई भेटाया, दुर्गम बंदीशाली

एकलकोंड्या जगती हा अंकूर कुठून आला?
नवलाने अन् महा कौतुके रोज पाहतो त्याला"         ... आपली कविता खूप आवडली, पुढील रचनेच्या प्रतीक्षेत !