प्रशासक आणि इतर मनोगती,
अनेक वेळेस मराठीतील यथार्थ समर्पक शब्द सापडत नाही. व्हर्जन या शब्दासाठी माझा आणि मिलिंद यांचा पत्रव्यवहार चालु आहे. कृपया त्याचे अवलोकन करावे ही विनंती.
त्याच बरोबर असे काही सदर सुरु करता येईल का कि जेथे तत्काळ (ऑनलाईन) शब्द विचारता येईल अथवा इतरांना सांगता येईल ( थोडेफार चाटींग सारखे) किंवा काही नाविन्यपुर्ण कल्पनेचे स्वागतच आहे.
या समस्येतुन काही संधी शोधता येईल का?
सर्वांना नम्र विनंती.
द्वारकानाथ
पत्रव्यवहार खालीलप्रमाणे....
असा छापलेला वाचला आहे.कोणते version(प्रतिशब्द सुचवा रे कोणीतरी) बरोबर आहे?
आवृत्ती हा शब्द कसा वाटतो.
द्वारकानाथराव,
आवृत्ती हा शब्द version पेक्षा edition साठी योग्य वाटतो.
मिलिंद
edition साठी संपादन शब्द योग्य आहे असे वाटते.
यथार्थ शब्द शोधतो.
द्वारकानाथराव,
to edit(verb) साठी संपादन करणे किंवा संपादित करणे बरोबर आहे.Edition(noun) as in first edition,second edition (of a book) साठी मराठीत आवृत्ती शब्द वापरात आहे(उदा.पुस्तकाची पहिली/दुसरी/तिसरी आवृत्ती ).मात्र एकाच कवितेतील किंवा लेखातील काही ओळी वेगवेगळ्या ठिकाणाहून उद्धृत केल्या असता त्यात आढळलेले फरक या अर्थाने जेव्हा version शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा प्रतिशब्द कोणता?मीही शोध घेतोय, तुम्हीही सुचल्यास/सापडल्यास मला कळवा.
मिलिंद