गोष्ट अत्यंत सुंदर आहे. अत्यंत आवडली.
अशाच धरतीची दुसरी एक गोष्ट मला सापडली होती इंग्रजीमध्ये. जिचा अनुवाद काहिसा असा होईल..
~~~
आधीच पैशाची तंगी आणि त्यात एक छोटासा खोका काय तो सजवायला आपल्या ३ वर्षाच्या पोरीने इतका चांगला सोनेरी कागद संपवावा म्हणजे त्याला राग येणे साहजिकच होते की..
तरीही दुसऱ्या दिवशी ती पोर त्याच्याकडे तो सजवलेला खोका घेऊन आली.
"बाबा, हे घे ! " नाताळची भेट म्हणून तिने ते खास त्याच्यासाठी बनवले होते. काल आपण पोरीवर उगाच वसकलो म्हणून त्याला स्वतःचीच कीव वाटणार पण तो खोका उघडून पाहिल्यावर तो रिकामा असल्याचे कळताच परत चवताळला.
"कोणाला भेट देताना असा रिकामा डबडा देतात का?" त्याचे रागोद्गार.
रडवेल्या चेहऱ्याने बापाकडे पाहत ती पोर म्हणाली, "रिकामा कुठेय? मी इतक्या सग्गळ्या पप्प्या भरल्या होत्या त्यात. त्या सग्गळ्या तुमच्याचसाठी आहेत ! "
वसकायच्या आधी पोरीची भाबडी भावना लक्षात घ्यायचा प्रयत्न केला नाही ही स्वतःची चूक लक्षात येऊन त्याने आपल्या बाळीला प्रेमाने कवटाळले आणि माफी मागितली.
काही दिवसांनी एका अपघातात ती पोर दगावली आणि मग त्या सोनेरी डब्याची जागा तिच्या वडलांच्या अगदी हृदयात झाल्यासारखीच झाली. जेव्हाही कधी त्याला अगदी निराश वाटे, तो त्या खोक्यातली एक काल्पनिक पप्पी काढून घेऊन त्यातले आपल्या पोरीचे प्रेम अनुभवायचा !