माहितीपूर्ण लेख आवडला आणि छायाचित्रेही सुरेख आहेत. सूर्याचे प्राचीन मंदिर कोंकणात असेल याची कल्पना नव्हती.
दोन-तीन वेळा ह्या घाट्याला (अस्मादिकांना) कोकण्यात जायचे पुण्य लाभले आहे पण तेथे गेल्यावर स्थानिक मंडळी जवळपासच्या प्रसिद्ध ठिकाणांची (मग ती मोठी/छोटी असली तरी) माहिती देत नाहीत. "येवा कोंकण आपलाच असा" नावाची नाटके काढून उपयोग नाही तर आपल्या भागातल्या पर्यटन स्थळांची माहिती अगत्यपूर्वक प्रसिद्ध केली तर तेथे पर्यटन वाढीस लागेल.
मे महिन्यातल्या कोंकण पर्यटनात रत्नागिरी व गणपतीपुळे च्या मध्ये असलेल्या बसणी गांवी ४ दिवस मुक्काम होता. ह्या भेटीआधी ही माहिती वाचनांत आली असती तर उपयोग झाला असता.
आता 'ब्रेड अँड बेड' च्या धर्तीवर कोंकणात पर्यटकांची राहण्याची सोय व्हायला लागली आहे हे बघून समाधान वाटले. तरीही पर्यटक आले की 'काय ही शिंची कटकट' ह्या नजरेनेच त्यांच्याकडे बघितले जाते.