उदाहरणासाठी एखाद्या निषिद्ध गोष्टीचा उल्लेख करायचा असेल तेव्हा आपण  किंवा तुम्ही वापरायचे नाही.

उदाहरणार्थ: १. आपल्याला/तुम्हाला खून करायचा असेल तर आपण/तुम्ही काय करू/कराल? --अयोग्य.

              २. एखाद्याला खून करायचा असेल तर तो काय करेल?- योग्य.

माझी मदत करा. - अयोग्य; मला मदत करा किंवा माझी मदत घ्या/माझ्या मदतीला या. - योग्य.

तिचा अपघात झाला. -अयोग्यः पण तिला अपघात झाला किंवा  तिचा अपघाताचा विमा उतरवलेला होता. - योग्य.