या दोन्ही शब्दांचा उच्चार एक नाही. अनेकदा पायमोडक्या अक्षरानंतर एक यती घेतला जातो, त्यामुळे कार्यसिद्धीचा उच्चार कार्यसिद्-धी. हा अयोग्य उच्चार. त्यामुळे कार्यसिद्धी असेच लिहायला पाहिजे. कार्यसिध्दी या शब्दाचा तर उच्चार करणे महाकठीण आहे.
एका बालोद्यान पाटीसमोर एक लहान मुलगा हट्ट करीत होता, " मला या यानात बसायचे आहे". यावरून योग्य तो धडा घ्यावा.
बालोद्यान. बालोद्यान नाही. आत्म्याने. आत्म्याने नाही. विद्वांस. विद्वांस नाही. तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान नाही.
असे पाय मोडून लिहिणे म्हणजे इंग्रजीत (रोमन लिपीत) फादर-मदर लिहिण्याऐवजी फॅटहर-मॉटहर असे लिहिण्यासारखे आहे.
जेव्हा ट, ठ ड सारख्या अक्षराला स सारखे अक्षर जोडावे लागते तेव्हा ट च्या खाली स जोडता येत नसल्यास नाईलाजाने ट चा पाय मोडावा लागतो. अशी उदाहरणे: स्पोर्ट्स, लॉर्ड्स, नॉर्दॅम्प्टन वगैरे.