यावरून आठवले.  एक गवई गात होते-- पांडुकु मारा, पांऽऽडुकु मारा, पांडुकु माऽऽरा, पांडुकुऽऽ मारा वगैरे वगैरे.  कंटाळून एक श्रोता मोठ्याने म्हणाला, "अहो, पांडुकु मारा हे समजले, पण किसने मारा और किधर मारा ये तो बतावो" तेव्हा गवई पुढची ओळ गायले " पांडुकुमारा वीर अर्जुना.. " वगैरे.

तसेच, आपल्याला न आवडणारे न. चिं. ऊर्फ नरसिंहराव केळकर एका नाटकात प्रेक्षक म्हणून बसलेले दिसताच गायक नटाने गायला सुरुवात केली, "रूपबली नरशाऽऽ, नरशाऽऽऽ... आणि बऱ्याच वेळाने "रूपबली नरशार्दुल साचा".