मराठी ही संस्कृतपासून निर्माण झाली हे नक्की.
म्हणजे थेट संस्कृतचे अपत्य की कसे? सविस्तर समजावून सांगितल्यास बरे! त्यातही नेमक्या कुठल्या संस्कृतचे म्हणजे (वेदकालीन की मध्ययुगीन) अपत्य हे सांगितल्यास उत्तम!

..... तिच्यात अनेक शब्द संस्कृतसारखेच आहेत, किंवा जवळजवळ तसेच आहेत, त्यार्थी संस्कृतचे शब्द बनवण्याचे आणि व्याकरणाचे नियम मराठीत असले तर त्यात काही विशेष नाही....
मराठीत अनेक शब्द फार्शी किंवा अरबीसारखेच आहेत, किंवा जवळजवळ तसेच आहेत. त्यार्थी फार्शीचे किंवा अरबीचे शब्द बनविण्याचे आणि व्याकरणाचे नियम मराठीत असले तर त्यात विशेष नाही, असा  निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही. आपणांस काय वाटते?