आपले म्हणणे अगदी पटले मला.

आज-काल या 'रिऍलिटी शोज्' ला त्यातले स्पर्धक जरा जास्तच महत्त्व देताना दाखवतात. स्पर्धेतून बाहेर काढले गेल्यावर त्यांचे ते गळ्यात गळे घालून (गळे काढून) रडणे हे अती वाटते. आजपर्यंत कधी काही स्पर्धा होवून त्यातून कमी गुण असलेले स्पर्धक कमी झालेतच नाहीत का? त्यांनी ती निराशा सहन केलीच ना?

मला तर वाटते की या स्पर्धांचे टीआरपी वाढवण्यासाठी त्यात ते भावनाप्रधान होवून रडणे वगैरे दाखवतात आणि त्यानुसार स्पर्धकांनी स्वतः ला अतिशय दुःख करून घेऊन रडणे किंवा आक्रमकता (अग्रेसिव्हनेस?) दाखवणे ही फॅशनच झालीये.

असे झाल्याने पालकही विचार न करता मुलांवर नको तितक्या अपेक्षा लादतात. त्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने मुलांना नैराश्य येणं निश्चितच आहे. केवळ एक स्पर्धा जिंकण्यासाठी केलेल्या हट्टापायी मुलांच्या मनावर दीर्घकाळासाठी परिणाम होतो. एका अपयशामुळे ते आत्मविश्वास गमवू शकतात.

आपल्या मुलांच्या मानसिकतेची काळजी घेणं हे पालकांचं कर्तव्य आहे आणि स्पर्धा-आयोजकांचं नक्कीच नाही.