शुभाननजी ,

लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद!

१) दानधर्म केल्याने पुण्य मिळते आणि

२) मी पुण्याला जातो

या दोन वाक्यात ठळकपणे दाखवलेले पुण्य हे शब्द एकाच पद्धतीने लिहिलेले आहेत. पण क्र. १ च्या वाक्यात पुण्य वर जोर देऊन उच्चार केला जातो तर क्र. २ च्या वाक्यात जोर दिला जात नाही. हा फरक लिखित स्वरूपात कसा व्यक्त करता येईल?

तसेच ज आणि ज्य / झ आणि झ्य या  उच्चारातील फरक हिंदीमध्ये दाखवण्यासाठी ज च्या खाली एक टिंब दिले जाते. असे मराठीतही करता येईल.