"माझा मुलागा इतरांपेक्षा खूप हुशार आहे. यश घेऊनच तो जन्माला आलाय; अपयश त्याला माहीतच नाही, ' हे सांगण्याची चढाओढ सध्याच्या "आई-बाबां'मध्ये दिसते. मुलांकडे तटस्थ वृत्तीने पाहून त्यांच्यातील गुण-दुर्गुण ओळखण्याची "हिम्मत' पालकांकडे नसेल तर मुलेही तकलादू मनोवृत्तीची बनतील.
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतंत्र कुटुंब आणि आई आणि बाबा दोघे नोकरदार असल्याने बहुतांची मुले पाळणाघरात असतात. वेळे अभावी त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याने, संध्याकाळी घरी आल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी त्यांचे लाड होणे अनिवार्य असते. अशातच त्यांचे हट्ट पुरवले जातात. दुर्गुणाकडे दुर्लक्ष होते. पाल्याबद्दलच्या इतर अपेक्षा मात्र कमी होत नाहीत. अर्थातच त्या पुर्ण होण्यासाठी पालकांचे स्वतःचे प्रयत्न थीटे पडतात.