'मराठीतील उच्चार व त्यांना दिलेली देवनागरीतील चिन्हे' आणि 'संस्कृतमधील उच्चार व त्यांना दिलेली देवनागरीतील चिन्हे' यात भिन्नता आहे. गर ती तशी आहे तर 'संस्कृत-देवनागरी' आणि 'मराठी-देवनागरी' अशा दोन भिन्न लिपी ठरतात. मराठीने आता तरी हे स्वीकारले पाहिजे आणि 'मराठमोळी-देवनागरी' स्वीकारली पाहिजे.

भिन्नता ही केवळ ४/५ चिन्हांपुरतीच आहे. केवळ तेवढ्याचसाठी देवनागरी ऐवजी मराठमोळी-देवनागरी असे नाव दिल्याने तुमचा प्रश्न सुटणार आहे का? तसे असेल तर फारच सोपे.
चहा-चमचा, जेवण-जीवन, झगा-झेंडा तसेच  पुण्यात पाऊस-पुण्यसंचय  यातील फरक दाखवण्यासाठी आणखी काही चिन्हे मराठमोळी-देवनागरी ह्या लिपीच्या वर्णमालेत घालावीत असे तुम्हाला वाटते का?

पूर्वी मराठी मोडी लिपीत लिहीत. ती देवनागरीत केव्हापासून आणि का लिहू लागले याबद्दल काही माहिती आहे का?