आपल्या ह्या लेखासंदर्भातल्या टिपण्या व प्रतिक्रियांशी मी पूर्ण नसलो तरी बहुतांशी असहमत आहे.

रिऍलिटी शो सुरू करा हे पालकांचे म्हणणे होते का ? अश्या स्पर्धा ह्यापूर्वी स्पर्धा निकोप व्हायच्या - रिऍलिटी शो त्या स्पर्धांच्या वेळी अस्तित्वात नसूनही त्या स्पर्धा होतच असत ना ? रिऍलिटी शो सुरू झाले ते वाहिन्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी.
सचिनचा मराठीत चालणारा नाचावरचा (नांव आठवत नाही) रिऍलिटी शो बघितला असेलच. प्रत्येक कलाकाराचे त्याच त्याच शब्दांतून कौतुक, प्रत्येकालाच "तुला मी माझ्या पुढच्या चित्रपटात घेईन...." वगैरे शब्द बोलण्यासाठी मुलांचे पालक त्यांना प्रवृत्त करतात की वाहिन्यांचे मालक ?
आजवर झालेल्या रिऍलिटी शो मधून किती हिरे बाहेर पडले ? त्यांना पार्श्वगायनाच्या किती संधी मिळाल्या ? हल्लीच्या सुप्रसिद्ध अवधूत गुप्ते किंवा वैशाली सामंत पैकी किती जणांनी रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला होता व म्हणून ते चमकले ? ह्याची उत्तरे नकारात्मक दिशा दर्शवतात.

परीक्षक वर्गाला आपापसात भांडताना पाहिले की हा कसला पोरखेळ चाललाय तेच समजत नाही. पालकांनी त्यांना तसे भांडायला सांगितले आहे का ? मग पालकांना दोष का द्यावा ? कुठल्या व्यक्तीला आपल्या मुला/मुलीने पुढे चांगले नांव कमवावे हे वाटत नाही ? त्यासाठी पालकांनी मुलांना थोडी फार अतिरिक्त तयारी करायला लावली तर हरकतच काय ?

आपण जे चित्र उभे करतोय ते फक्त वाहिन्यांवरील 'रिऍलिटी शो' बद्दलच आहे, पण जीवनातल्या रिऍलिटी बद्दल काय ?
सचिन तेंडुलकर  व विनोद कांबळी ह्यांनी अवजड क्रिकेटचे  कीट लहान असल्यापासून पाठीवर घेत मुंबईतल्या लोकलने प्रवास केलेच आहेत ना ? 'गर्दीत मी कित्येकदा लोकांच्या शिव्याशाप खात माझे कीट सांभाळून नेले' असे विनोद कांबळीने एका मुलाखतीत लिहिल्याचे आठवते. दोन्ही वेळेचा डबा, शाळेचे दफ़्तर व क्रिकेटचे कीट हा सरंजाम घेऊन त्याने व सचिननेही लोकल मधून प्रवास केला म्हणून तर ते आज आहेत तेथे आहेत.
गरिबाघरची (गॅस सिलेंडर पोहचवण्याऱ्या माणसाची) मुले एका खोलीत गर्दीचा गोंगाट सहन करीत दहावीत सर्वांपेक्षा जास्त गुण कमवतातच ना ?

इंग्रजीत एक सुभाषित वाचले होते नेमके शब्द आठवत नाहीत - "गेटींग फेल्युअर इज नॉट अ क्राईम, किपींग अ लो एम इज अ क्राईम".
"आमच्या वेळी कोणी असे मार्गदर्शन करायला असते तर..... "  असे म्हणत बसण्यापेक्षा आपल्या पाल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून आजच्या प्रगत व स्पर्धक युगासाठी तयार करणे ह्यातच शहाणपण आहे. 

लेख व प्रतिक्रियां मधील फक्त एकाच गोष्टीशी सहमत -
पाल्यावर अतिरिक्त भार टाकू नये ! त्याच्या /तिच्या क्षमते व आवडीनिवडी नुसार त्याला घडवावे.