तसेच ज आणि ज्य / झ आणि झ्य या उच्चारातील फरक हिंदीमध्ये दाखवण्यासाठी ज च्या खाली एक टिंब दिले जाते.
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे टिंब (नुक्ता) आता शुद्ध हिंदीवाल्यांनी नाकारले आहे. ही टिंबे (नुक्ते) देऊनही हिंदी भाषकांचे उच्चार काही नीट होत नव्हते, हेही खरेच. उदा॰ दर्जा हा शब्द बहुसंख्य हिंदी भाषक दर्जा असा उच्चारतात, तर 'दहलीज़' हा 'दहलीज' असा.