सोनल११

अभिनंदन... चांगला विषय घेतला आहे चर्चेला.

संस्कृत भाषा शिकण्याची ओढ आजच्या पिढीला वाटणे, हे ती भाषा कालजयी असल्याचेच लक्षण होय.
व्यक्तिशः संस्कृत ही भाषा मला फार म्हणजे फारच आवडते. थोडेफार गम्यही आहे. :)  अर्थातच, या भाषेतील अद्भुतरम्य काव्ये वाचण्यासाठीच मी ही भाषा काही वर्षांपूर्वी (थोडीफार) शिकलो... पण ते तेवढ्यापुरतेच राहिले. जुजबी स्वरूपाचे.  
ही भाषा सखोल, स्रर्वांगीण शिकायची इच्छा असूनही योग्य गुरूअभावी ती आजवर शिकता आलेली नाही. काही संस्कृततज्ज्ञांना यासंदर्भात विचारलेही; पण त्यांनी खूपच भाव खाल्ला, शिष्टपणा केला... [ (अर्थात तो शिष्टपणा संस्कृतातील नव्हता; तर मराठीतील होता... :) ]. संबंधितांनी भाव खाल्ला, शिष्टपणा केला, हे सांगताना अतिशय दुःख होत आहे... असो. पण या संबंधितांच्या या शिष्टपणानंतरही माझी संस्कृत भाषेची ओढ, आस कायमच राहिली... राहीलही...
.......
भविष्यात कधीतरी मी नक्कीच सु-संस्कृत होईन, अशी मला आशा आहे!
.......
संस्कृत भाषेचा उदय खरोखरच भारतातच झाला का?
.......