चहा-चमचा, जेवण-जीवन, झगा-झेंडा तसेच पुण्यात पाऊस-पुण्यसंचय यातील फरक दाखवण्यासाठी आणखी काही चिन्हे मराठमोळी-देवनागरी ह्या लिपीच्या वर्णमालेत घालावीत असे तुम्हाला वाटते का?
बापरे ! आधीच मुळाक्षरे काय कमी आहेत म्हणून ही आणिक भर घालायचा विचार चालू आहे? मग तर माझा आणिक प्रश्न आहे.. च+ह=छ, ग+ह=घ तर मग म+ह=म्ह का? 'म्ह'साठी देखील एक मुळाक्षर बनवा ! शिवाय 'ह' शी झालेल्या निरनिराळ्या अक्षरांच्या दोस्तीलाच का स्वतंत्र मुळाक्षरे? बाकीच्या अक्षरांनी काय घोडे मारले आहे? होऊन जाऊ देऊया त्यांच्याहीसाठी स्वतंत्र मुळाक्षरे.. कसे? मागे एकदा कोणीतरी मनोगतवर ही जोडाक्षरे का वापरली जात नाहीत अशा अर्थाचा एक चर्चाप्रस्ताव टाकल्याचे आठवते.. मुळाक्षरांची झुकझुकगाडी अशीच लांबवत न्यायची म्हटले तर त्या चर्चाप्रस्तावात आणखीन मौलिक भर पडेलसे वाटते.