अभिराम व समस्त मनोगती,

आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

अभिराम,

मी नवशिक्या लेखक आहे. तेव्हा मझ्याकडून चुका होऊ शकतात हे मी मान्य करतो. जे मनाला पटेल ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. ललित कथांमधूनही सामाजिक विषय ऐरणीवर घेणारे अनेक दिग्गज आपण पाहत असतो. तेव्हा मी जर का एखाद्या सामाजिक विषयाला हात घातला तर काय चुकले हे मला कळले नाही.

कृपया प्रचारकी सूर म्हणजे काय व तो आपणाला कोठे जाणवला हे सांगितलेत तर फार बरे होईल. ते समजल्यास व मनाला पटल्यास आगामी लेखनाच्या वेळी मी आवश्य आपल्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवील.

असाच कृपालोभ असू द्या.

आपला,

(कृतकृत्य) भास्कर