माधवजी आपले म्हणणे बरोबरही असेल पण मला ह्याच्या उलट थोडा अनुभव आला आहे. मी स्वःत साताऱ्याचा आहे. त्यामुळे कोकणचे आकर्षण हे होतेच.(जवळ जवळ १०-१२ वाऱ्या झाल्या आहेत कोकणाच्या-वेंगुर्ल्यापर्यंत).
रत्नागिरिला आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी होतो त्यांच्या शेजारी असलेल्यांनी आमची खुप काळजी घेतली. कशेळी, आडिवरे, गणेशगुळे इ. गावांची माहिती त्यानीच आम्हाला सांगीतली (हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्यामुळे कदाचित तुम्हाला काही वेगळा अनुभव आला असेल). पण मनापासून सांगतो कि मला आलेला अनुभव खरंच खुप चांगला होता.