च+ह=छ, ग+ह=घ तर मग म+ह=म्ह का?

च + ह = छ किंवा ग + ह = घ हे साफ चूक आहे. सतत इंग्लिश स्पेलिंग डोक्यात असल्याने आणि इंटरनेटवर रोमनमधून मराठी लिहिण्याची सवय लागल्याने पुष्कळांना तसे वाटते, तरी मराठीत तसे नाही.

च + ह (खरे तर च् + ह) = च्ह आणि ग + ह (खरे तर ग् + ह) = ग्ह होईल तसेच म + ह (खरे तर म् + ह) = म्ह होतो.

(क, ग अशा) व्यंजनात ह सदृश्य उच्चार मिसळून (ख, घ अशी) अधिक व्यंजने होतात पण (म सारख्या) अनुनासिकात ह सदृश्य उच्चार मिसळता येत नाही.