फार्सीमध्ये दोन च नाहीत. पण ५ ज, ३ स, २ त, २ क, २ ख, २ ग, २ ढ आणि २ ड आहेत. याशिवाय प चा फ होऊन आणखी एक फ होतो आणि क चा ख होऊन आणखी एक ख. तमिळमध्ये २न, २र, २ल, २ळ आहेत.  अर्थात या सर्व अक्षरांसाठी वेगळ्या खुणा आहेत.

फार्सीत मराठीसारखे २ झ नाहीत, पण इंग्रजीत आहेत. च, ज, झ, फ चे वेगळे उच्चार मराठी उच्चारकोशात दाखविले की आपले काम भागेल.  मराठी मातृभाषा असणाऱ्यांसाठी वेगळ्या अक्षरखुणा नकोत. इंग्रजी श साठी सी, एस, एस्‌सी, एस्‌एस, एस्‌एच, टीआय्‌ओ यातले कुठलेही एक अक्षर येऊ शकते, तसेच सी चा स किंवा क उच्चार झाला तरी आपण सहन करतो, मराठीलाच ती मुभा का नाही?