पुण्य हा संस्कृत शब्द, म्हणून त्याला ला लागून होणाऱ्या शब्दाचा उच्चार 'पुण्ण्याला', पण लिखाण 'पुण्याला'.
'पुणे' मराठी, म्हणून ला लागून लिखाण आणि उच्चार 'पुण्याला'
असे सर्व संस्कृत आणि मराठी शब्दांच्या बाबतीत होते, अपवाद एखादाच- जिल्हासारखा.
पहाः वह्या-वाह्यात. गनिमी काव्याने-शाहिरी काव्याने, सुकन्या(पुं) कोळी, सुकन्या(स्त्री) कोळी, सद्या(पुं)-विद्या(स्त्री).
च, ज, झ आणि फ यांचे वेगळे उच्चार दाखवण्यासाठी माझ्या माहितीचे काही लेखक अक्षराखाली टिंब देतात.