माझ्या कल्पनेप्रमाणे नुक्ते काढण्याचे ७६/७७ साली झाले असावे.
अवांतर. : आम्हा मित्रांची ह्यावर चर्चा चालू होती. मी मित्रांना "हे नुक्ते नाही दिले तरी आता चालते." असे सांगितल्यावर माझा एक मित्र म्हणाला, "अरे आपण एसएससीला असताना होते की नुक्ते. " त्यावर मी म्हणालो, "हो नुकतेच काढले.!"