प्रभाकरपंत,
आपल्याला काहीतरी गैरसमज झालेला दिसत आहे. मी "मागासवर्गीयांवर" ही शासकीय संज्ञा माझ्या कथेत/प्रतिसादात कुठेही वापरलेली नाही. मी उल्लेख केला आहे तो समाजातल्या मागास भागाचा. या मागास भागात अर्थीक दृष्ट्या दुर्बल व्यक्तीचा, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, समावेश होतो. माझ्या पूर्वीच्या लेखनात सुद्धा तुम्हाला हेच दिसून येईल. तसेच याच कथेतील पुढील वाक्य सुद्धा हेच दाखवून देईल की तुम्ही लिहिलेल्या "बिगर मागासवर्गियां"बद्दल मी काहीही अन्याय केलेला नाही...
"गरीब असला तरी वरच्या जातीतला असल्याने मुक्याला वसतिगृहाने प्रवेश नाकारला"
आपला,
(सर्वसमावेशक) भास्कर
ता.क.- आपण आम्हाला जेष्ठ आहात तेव्हा आमच्या लिखानात कुठेही काही गैर आढळल्यास असाच कान धरत जा.
कलोअ...