आपल्या ह्या लेखासंदर्भातल्या टिपण्या व प्रतिक्रियांशी मी पूर्ण नसलो तरी बहुतांशी असहमत आहे.

-----------

रिऍलिटी शो स्वत:च्या तुंबड्या भरणारच; पण त्यांनी मोठे व्यासपीठ नवकलाकारांना उपलब्ध करून दिले त्याचे काय? तुम्हाला हे शो अत्यंत थिल्लर वाटत असतील. शाळेतील स्नेहसंमेलनही रटाळच असते; पण आपला मुलगा/नातेवाईक नाचणार, गाणार म्हणून आपण पहायला जातोच ना, त्याबरोबर इतरांच्या मुलांची कलाही बघतोच. मग या शोजकडे मनोरंजनाचा साधन म्हणून पाहा ना! तुम्ही सचिन, विनोद कांबळीचे उदाहरण दिले आहे. आमचंही म्हणणं तेच आहे की कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.