आपण सरसकट पालकांना दोष देऊन तुंबड्या भरणाऱ्या व खोटी / नाटकी भांडणे दाखवणाऱ्या वाहिन्यांना उजवा कौल देत आहात म्हणून काही उदाहरणे दिलीत.
रिऍलिटी शो वाहिन्यांवर दाखवले म्हणून हे कलाकार नावारूपाला आले असे म्हणणे धाडसाचे आहे. उदाहरणे ३ वेगवेगळ्या क्षेत्रातली दिली आहेत.
गायन - अवधूत गुप्ते व वैशाली सामंत - हे कलाकार कुठल्याही रिऍलिटी शो मध्ये भाग न घेताही नावारूपाला आली.
गायन २ - सध्या अभिजित कोसंबी व मंगेश बोरगावकर काय करतात हा कळीचा मुद्दा आहे. 
क्रिकेट - मेहनत करणाऱ्याला यश गवसणी घालते हे समजवण्याचा प्रयत्न होता.
शिक्षण - परत एक वेळा (कॉपी पेस्ट करून)  मेहनत करणाऱ्याला यश गवसणी घालते हे समजवण्याचा प्रयत्न होता.

पालकांचा दोष इतकाच की ते शॉर्ट कट घ्यायला धावले, त्यांनीही मनोरंजनाचे साधन म्हणून ह्याचा स्विकार करायला हवा होता.