शनीवार दुपार. छानशी डुलकी झाली आहे, शाल अजून अंगावरच आहे, बाहेर पाऊस पडतोय, आत्ताच बशीभर मीरगुंड संपवलेत, २-४ मिनिटातच ते गरम गरम दैवी कषाय पेय येईल... !

आणि सोबतील तुमच्या सारखा मनोगती.... भाग्यासी काय उणे रे!

( आपला नवरा आठ्वड्याचे पाच दिवस राब- राब राबतो तेव्हा असा आराम हा त्या बिचाऱ्याचा हक्कच आहे! असा मी तिचा मी छान गैर-समज करून दिला आहे...... कृपया वाचकांनी नजर लावू नये.....लग्नानंतरचे हे पहीलेच घवघवीत यश आहे!)

मज्जा आली, धन्यवाद.