संदीप खरे आहे तुमचे म्हणणे... पण कोणाला वेळ आहे हा विचार करायला??  शेजारचा पळतोय म्हणून मीही पळतोय...  काही दिवसांनी पळण्याची इतकी सवय होते की कशासाठी पळतोय तेही विसरायला होते.   जे मिळवायचे होते ते कधीच मिळाले,  पण आपले लक्षच नव्हत ेतिकडे.  आपण पळतोयच असे होते.  कुठे थांबायचे हे कोणालाच माहित नाही... शिवाय थांबलो तर बाकीचा पळणारा समाज वेड्यात काढेल आपल्याला ही भीती सुध्धा असते मनात...